Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

नवीन नांदेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक बळकटी देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्यामुळे पात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावर पहिला हप्ता 3000 रुपयाचा मिळालेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिलांचा साडीचोळी देऊन रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सन्मान केला आहे . नांदेड दक्षिण मध्ये हा कार्यक्रम आज पार पडला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वचनपुर्ती करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत रक्षाबंधन निमित्ताने माता भगिनी यांच्या सन्मान सोहळा सिडको येथे उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या निवासस्थानी व उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड आणि शहरसंघटक दशरथ कंधारे यांनी कार्यक्रम नियोजित केला होता.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर ,जिल्हा संघटक शंकर पिनोजी, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सुहास खराणे पाटील, तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे ,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शिराज भाई, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख रुपेश बारडकर,मुख्यमंत्री जनकल्याणचे बालाजी गाडगे, महिला आघाडी तालुकाप्रमुख स्नेहाताई पाटील, सिडको महिला शहरप्रमुख रूपालीताई कुलकर्णी, दिक्षाताई वंनजे,एकनाथ सर, जेष्ठ महिला लक्ष्मीबाई, गादेवार यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी उपशहरप्रमुख प्रमुख पप्पू गायकवाड ,राजीव तमन्ना,बालाजी वाघमारे,राजेश गायकवाड, निवृत्ती गायकवाड,सुरेश कांबळे,नितीन वाघमारे,ज्योतसिंग बावरी,बाळू आढाव,दिलीप कांबळे,बंटी कोकरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख तुलजेश यादव यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button