देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरात शनिवारच्या मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे नदी-नाल्यांना अचानक पुर आला. शिवारात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील सोयाबीनसह तूर, कपाशीची पिके वाहून गेली. नदीकाठच्या शेतातील मातीसकट पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


आधीच ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेगा कोमेजून गेले होते. आता या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडले आहे. प्रत्येक शेताची मशागत करण्यासाठी ४-५ हजारांचा खर्च येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.



नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना सर्वसामान्य अनुदान न देता, प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. “पश्चिम महाराष्ट्राला अनुदान मिळते, मग मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे दुजाभाव का?” असा सवालही ते विचारत आहेत. शेतकऱ्यांनी आगामी रब्बी हंगामासाठी तातडीने अनुदान, बी-बियाणे आणि कास्तीची थेट मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.




