नांदेड| जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित पानमसाला, जर्दा, गुटका इत्यादीवर कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशानुसार शासनाने प्रतिबंधित केलेल्या रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 07.10.2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलूर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन देगलुर ते उदगिर रोडवर शिवाजी पुतळयाजवळ एक पांढ-या रंगाची महिंद्रा स्कार्पिओ वाहन क्रमांक MH 25 R 7151 थांबवून सदरचे वाहन चेक करण्यात आले.
या वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला रत्ना जर्दाचे 480 पुडे, प्रत्येक पुडा 400/- रु प्रमाणे एकूण 1,92,200/- रु, व स्कार्पिओ वाहन किं. अं. 6,00,000/- रू असा एकुण 7,92,000/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन वाहन चालक नामे मोहम्मद शरीफ पिता अब्दुल मसजीद रा.इस्लामपुरा नांदेड याचे विरूध्द पोलीस स्टेशन देगलुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी करणा-या पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
सादर कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड (IPS) खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड,उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, पोलीस अंमलदार बालाजी पोतदार, सोनबा मुंढकर, कृष्णा तलवारे, नारायण येंगाले, रणजित मुदिदराज, अनिल वाघमारे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.