Accused transporting Ratna Zarda : रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल जप्त -NNL
नांदेड| जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित पानमसाला, जर्दा, गुटका इत्यादीवर कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशानुसार शासनाने प्रतिबंधित केलेल्या रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 07.10.2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलूर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन देगलुर ते उदगिर रोडवर शिवाजी पुतळयाजवळ एक पांढ-या रंगाची महिंद्रा स्कार्पिओ वाहन क्रमांक MH 25 R 7151 थांबवून सदरचे वाहन चेक करण्यात आले.
या वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला रत्ना जर्दाचे 480 पुडे, प्रत्येक ...
