Special brief revision of electoral rolls and regularization of polling stations | हिमायतनगर येथे मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण व मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण संदर्भात बैठक संपन्न – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर येथे दिनांक 20 रोजी तहसील कार्यालयात सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थीतांना निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण – २०२४ मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात आले. तसेच शहरांसह तालुक्यातून आठ ठिकाणी नवीन मतदान केंद्रांची स्थापना करण्यासाठीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड यांच्याकडून देण्यात आली.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२४ राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेवरून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यान आली. भारत निवडणूक आयोगाच्या सूचना तसेच राजकीय पक्षांकडून प्राप्त सूचना विचारात घेउन मतदान केंद्रांच्या सुसुत्रिकरणाच्या संदर्भात खालील सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी विलंब होवू नये या करीता भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर १ हजार तीनशे पन्नास पेक्षा जास्त मतदार असतील तर त्या मतदान केंद्राचे विभाजन करावे. दोन की. मी. पेक्षा जास्त अंतर चालून जावून मतदान करावे लागत असेल तर त्या ठिकाणी स्वतंत्र मतदान केंद्र सुरु करावे.

स्वतंत्र मतदान केंद्र करण्यासाठी 300 पेक्षा जास्त मतदार असावेत कमी मतदारांसाठी नवीन केंद्र निर्माण करू नये. एकाच ठिकाणी (इमारतीत) एका पेक्षा जास्त मतदान केंद्र असतील आणि मतदार संख्या असमान असेल तर सुसूत्रता करण्यात यावी. मतदारांचे विभाजन करतेवेळी कुटुंब विभाजन होवू नये, वाढीव मतदार दुसऱ्या इमारतीत कोणत्याही परिस्थितीत मतदार वाढीमुळे तयार झालेली नविन मतदान केंद्र दुस-या इमारतीत ठेवण्यात येऊ नये इत्यादी सुचना देण्यात आल्या.


त्याच प्रमाने हिमायतनगर तालुक्यातील डोलारी, कोतलवाडी, पळसपुर, टाकाराळा/मानसीग तांडा, वाई/वाईतांडा, सवना, हिमायतनगर (हू.ज.पा. कॉलेज), धानोरा (ज), सरसम या गावांचे मतदार संख्या विभाजन करून नवीन मतदान केंद्र तयार करण्यासाठीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या नवीन मतदान केंद्राचे प्रस्ताव जिल्हाधीकारी नांदेड यांचे मार्फत निवडणूक आयोग महाराष्ट्रराज्य यांच्या कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत.




