करियरनांदेड

Promotion Congrats ; हिमायतनगर चे सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ए.जी. पदमवार यांची पदोन्नतीवर बिलोली येथे नियुक्ती -NNL

हिमायतनगर। येथील सहाय्यक निबंधक कार्यलयात कार्यरत असलेले ए.जी. पदमवार, सहकार अधिकारी श्रेणी 2 यांना पदोन्नती होऊन बिलोली येथे नेमणूक देण्यात आली आहे. याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नागोराव माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

IMG 20241231 151108 Promotion Congrats ; हिमायतनगर चे सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ए.जी. पदमवार यांची पदोन्नतीवर बिलोली येथे नियुक्ती -NNL

सहाय्यक निबंधक कार्यालय हिमायतनगर येथे कार्यरत असलेले अधिकारी ए.जी. पदमवार, सहकार अधिकारी श्रेणी 2 यांची नुकतीच पदोन्नती झाली असून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका येथे सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिनांक 31 डिसेंबर रोजी 2024 त्यांना कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

IMG 20241231 151119 Promotion Congrats ; हिमायतनगर चे सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ए.जी. पदमवार यांची पदोन्नतीवर बिलोली येथे नियुक्ती -NNL

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरचे सचिव नागोराव माने यांनी देखिल पदोन्नती बद्दल श्री पदमवार यांचे अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक निबंधक ए. एम.गोडसे, जी. जी. मिराशे, सहकार अधिकारी श्रेणी 1, विनोद कोरेवाड, मुख्य लिपीक, कोमल चांदेकर, हिलाल भाई, सचिव बीबी शिंदे, नंदू आलूकाटलेवाड, दिगंबर गायकवाड, बोरगडी, पत्रकार अनिल मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!