नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या वाढदिवस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी येथे जवळपास 550 विध्यार्थी यांच्या उपस्थितीत आयोजक शिवसेना शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून व केक कापून लहान विध्यार्थी समवेत साजरा करण्यात आला.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढांरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी येथे 2ऑगस्ट रोजी विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे,अशोक मोरे,सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ जटाळे, मुख्याध्यापक अगंद जाधव, युवासेना जिल्हा प्रमुखमरसिंह साबळे ,पोलीस पाटील लवकुश अवनुरे, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी आयोजक सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने केक हा विद्यार्थी समवेत कापून वाढदिवस साजरा केला ,प्रचंड टाळ्यांचा कडकडाट व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




