लोहा| लोह्याच्या नाट्य कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील शेषराव कहाळेकर यांचे योगदान प्रेरणादायी होते. त्यांनी लिहिलेली नाटके त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब होते. एक चांगला मित्र , लेखक, व्यापारी , सामाजिक दायित्व जोपासणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते त्याचे जाण्याने वैचारिक पोकळी निर्माण झाली असा शब्दात मान्यवरांनी शिवॆक्य शेषराव शंकरराव कहाळेकर याना श्रद्धांजली अर्पण केली.


लोह्याचे भूमिपुत्र नाट्यलेखक शिवैक्य शेषराव कहाळेकर याचे मित्र हरिभाऊ चव्हाण यांच्या पुढाकाराने मित्रपरिवार व्यापाऱ्याच्या वतीने जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे शोक सभा व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालमित्र माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजळा देत मित्राच्या आठवणी सांगितल्या तर वर्ग मित्र सिनेकलावंत एकनाथ मोरे यांनी शालेय आठवणी तसेच झुंज तुझी माझी या सिनेमाच्या निर्मिती बाबत शेषराव यांच्या आठवणींना उजाळा दिल्या .माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार, प्रा डॉ धनंजय पवार, प्रा संजय बालाघाटे, तरुण उद्योजक नामदेव कटमवार, भास्कर पवार हरिहर धुतमल, बापू गायखर , संजय मक्तेदार, यांनी शब्दाजली अर्पण केली.


शिवसेनेचे ऍड मुक्तेश्वर धोंडगे माजी उपनगराध्यक्ष, रामराव सूर्यवंशी, केशवराव मुकदम, दता वाले ,अशोक संगेवार सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वांबर मंगनाळे,दिनेश तेललवार सचिन शेषराव काहलेकर, मलकार्जुन शेटे, प्रा टी एम शिंदे, माजी सभापती खुशाल पाटील, मारुती पाटील सुरेश हिलाल, बाळू पालिमकर, करीम शेख संभाजी चव्हाण, मुख्याध्यापक दामोधर वडजे, एच जी पवार,नायगाव नगर पालिकेचे अधीक्षक संतराम जाधव, सचिन टाले, दता शेटे सतीश आनेराव , बाबाराव शेटे, गजानन चव्हाण, मा भा कदम, हरी आळंदे, रत्नाकर पारेकर, पुंडलिक पवार, लोकमान्य ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी , चंदू कळकेकर, शहाजी पाटील मधुकर पवार,संजय काहलेकर यासह मित्रपरिवार , नातेवाईक मोठ्या संख्येने शोकसभेला उपस्थित होते.प्रास्ताविक आयोजक हरिभाऊ चव्हाण यांनी केले संचलन व आभार विक्रम कदम यांनी मानले.




