हिमायतनगर,अनिल मादसवार| शेतकर्यांना शासनाकडून शेत मशागत व इतर निविष्ठा कामांसाठी पंतप्रधान सन्मान निधीच्या माध्यमातून अर्थिक मदत मिळते. शासनाची ही मदत शेतकर्याना देण्यात येते. परंतू बहुतांश शेतकर्यांना शासनाची ही मदत मिळत नाही. मदत देण्यामध्ये अनेक प्रकाराच्या त्रुटी निर्माण होत असल्यानेच शासनाची मदत मिळत नाही. यामध्ये महत्त्वपूर्ण बाब अशी की, केवायसी करणे बंधनकारक ठरते. आणी म्हणून प्रथमतः शासनाकडून मिळणारा पि. एम. किसान योजनेचा हप्ता पदरात पाडून घेण्यासाठी इ केवायसी करूण घ्यावी. असे अवाहन तालूका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.
आज बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी शेतकरी, नागरिकांच्या तक्रारी येत असंल्याने पत्रकारांची टीमने भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तसेच जुन्या प्रस्ताव दाखल करणाऱ्यास कामावरून काढून या ठिकाणी पि. एम. किसान सन्मान प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी नवीन ऑपरेटर युवकाची नियुक्ती केली. त्यामुळे कामात पारदर्शकता येणार असून, नागरिकांनी देखील आपल्या समस्या सांगून त्याचे निराकरण करून घेणे अनिवार्य आहे. यावेळी पुढे बोलतांना जाधव म्हणाले की, शासनाच्या नियमानुसार २०१९ च्या अगोदर ज्यांनी पि. एम. योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले. त्यांनाच हा लाभ मिळविता येईल. तसेच मयताचा फेरफार त्याच्या वारसांच्या नावे झाल्यास तो लाभधारक या योजनेचा पात्र लाभधारक ठरू शकतो.
परंतू ज्यांनी नंतर जमीनी फोडून घेतल्या, त्यांना हा लाभ सध्यातरी मिळणार नाही. यानंतर शासनाचा नवीन नियम आला तर तो लाभ मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी आपले बैंक खात्याचे इ-केवायसी करून घेण्याचे आवाहन आमचे कृषीसहाय्य्यक गावा गावात फिरून शेतकर्यांना सांगत आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी करणे या योजनेसाठी बंधनकारक ठरते. इ केवायसी म्हणजे एक प्रकारे आपण जिवंत असल्याचा पुरावाच असा नियम आपणाला गृहीत धरता येईल.
म्हणून शासनाच्या नियमानुसार आपण इ केवायसी करूण पि. एम. योजनेचा लाभ घ्यावा. आणि यात कोणतीही अडचण आल्यास अधिक माहीतीसाठी आमच्या तालूका कृषी कार्यालयाशी संपर्क करून त्याचे निराकरण करून योजनेचा लाभ मिळून घ्यावा असे अवाहन तालूका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कृषी सहाय्यक, महिला, पुरुष शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.