नांदेड| कलावंताच्या दमदार अभिनयाने रसिक भामहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारी (ता.२५) नांदेड केंद्रावर ‘शापित सेवा’ या नाटकापासून थाटात सुरूवात झाली. पुढील बारा दिवस नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवणी मिळणार आहे.
कुसुम सभागृहात सोमवार सायंकाळी सात वाजता नाट्य परिषदेच्या अध्यक्षा अपर्णा नेरलकर, डॉ उमेश भालेराव, डॉ विजयकुमार माहुरे, सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी सचिन पाईकराव यांच्या उपस्थित स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून नंदू सावंत, देवदत्त पाठक, श्रीमती माणिक वडयाळकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर लेखक विनोद डावरे लिखीत ‘शापित सेवा’ हे परभणी येथील झपुर्झा सोशल फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी रसिक चांगलेच भारावून गेले होते.
नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवाणी
ता.२६ रोजी नांदेड येथील स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेतर्फे ‘व्हाईट पेपर’, ता.२७ रोजी नांदेड सांस्कृतिक मंचचे ‘पुन्हा एकदा’, ता.२८ रोजी नांदेड संकल्प प्रतिष्ठानचे ‘मोटिव्हेशन स्पीकर’, ता.२९ रोजी परभणी राजीव गांधी युवा फोरमचे ‘गंमत असते नात्यांची’, ता. ३० रोजी देगलूर मुक्ताई प्रतिष्ठानचे ‘ती रात्र हा दिवस’, ता. १ डिसेंबर दुपारी १२ वाजता नांदेड जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे ‘मी लाडाची मैना तुमची’ व संध्याकाळी ७ वाजता परभणी क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टचे ‘सहज सुचलं म्हणून’, ता.२ परभणी गोपाला फाउंडेशनचे ‘सेल्फी’, ता. ३ नांदेड तन्मय ग्रुपचे ‘वसुधैव कुटुंबकम’, ता. ४ परभणी बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळाचे विक्रमाचा घातांक ‘क्ष’, ता. ५ रोजी नांदेड आंबेडकरवादी मंचचे गांधी आंबेडकर, तर ता. ६ रोजी नांदेड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘वेलींच्या गाठी’ याप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.