हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती कळमनुरी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व इतर योजनांबाबत मार्गदर्शन व आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी आमदार संतोष बांगर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सीआरपी, बँक सखी, कृषी सखी व पशु सखी यांना मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही माता भगिनीला कुठेही,काहीही अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन असा शब्द देखील आमदार बांगर यांनी उपस्थित माता-भगिनींना दिला.
यावेळी सर्व माता-भगिनींनी आमदार संतोष बांगर यांची ओवाळणी केली. तेव्हा आमदार बांगर साहेबांनी सर्व माता- भगिनींना साडीचोळी भेट म्हणून दिली तसेच सर्वांच्या भोजनाची व्यवस्था देखील केली. तसेच सर्व माता-भगिनींशी मनमोकळा संवाद साधताना त्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या यावेळी सर्वांनीच फोटो काढण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी आमदार बांगर यांच्या सभोवताली गर्दी केली. यावेळी कळमनुरी औंढा व हिंगोली येथील बिडिओ, इतर अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.