लोहा। हैदराबाद ,पुणे मुंबई येथे गंभीर स्वरूपाच्या फुफ्फुस आजारावर उपचार केले जातात तेच उपचार नांदेड मध्ये फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी केले लोहा शहरातील ५८ वर्षीय संजय ( नाव बदलून ,) या रुग्णावर केले आणि वीस दिवसाच्या वैद्यक प्रयत्नातून त्या रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला रुग्ण नातेवाईकांनी डॉ समीर व त्याच्या टीमचे ऋण व्यक्त केले. आयएलडी नावाचा फुफ्फुस संसर्गवार हैदराबाद प्रमाणेच नांदेडला श्वास कर्मवीर मध्ये उपचार केले जातात .
लोहा तालुक्यातील संजय (नाव बदलून) .त्यांना फुप्फुसाचा आयएलडी नावाचा आजार झाल्याचे चेस्ट फिजिशियन व फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी निदान केले त्यानंतर हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ डॉ चंद्रकांत टरके यांच्याकडे तपासणी केली .रुग्णाची जेमतेम परिस्थिती असल्याने नातेवाईकांनी नांदेड मधील श्वास हॉस्पिटलमध्ये लोह्याचे भूमिपुत्र डॉ समीर कोटलवार यांच्याकडे दाखल केले. दिल्ली येथील नामांकित हॉस्पिटलचा अनुभव असलेले डॉ समीर यांनी हैदराबाद येथे लागणारी सगळी सुविधा व औषधी उपचार नांदेड मध्ये केले. वीस दिवसाच्या अथक व अचूक प्रयत्नातून रुग्ण संजय बरा झाला.आणि त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. लोह्याचे हृदयरोग तज्ञ डॉ मिलिंद धनसडे, ह्रदय रोगतज्ञ डॉ राहुल घंटे याचे समुपदेशन रुग्ण व नातेवाईकांना मिळाले.
आयएलडी हा फुफ्फुसाचा आजार गंभीर आहे त्याचा उपचार हैद्राबाद पुणे ,मुंबई येथे रुग्ण नातेवाईक करतात.तर आर्थिक संपन्नता असलेले नातेवाईक हे चेन्नई येथेही उपचार घेतात.पण डॉ समीर यांनी आयएसडी फुफ्फुस आजाराचा रुग्णावर येथेच उपचार करतात त्याच्याकडे अनेक पेंशट उपचार घेत आहेत. हैदराबाद ,मुंबई पुणे येथे या आजाराची उपचार घेणे खर्चिक आहे पण तोच उपचार भूमिपुत्र डॉ समीर गोपाळराव कोटलवार हे नांदेड मध्ये करता आहेत.लोहा येथील रुग्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्या नंतर त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू आले.त्यांनी डॉ समीर याचे ऋण व्यक्त केले.नांदेड मध्ये फुफ्फुसाच्या गंभीर आयएलडी नावाच्या आजाराचा नांदेड मध्ये उपचार होतो हे या रोगाच्या रुग्ण व नातेवाईकांना दिलासा देणारे आहे.डॉ विवेक कर्मवीर व टीम अशा गंभीर आजारावर येथेच उपचार सुविधा उपलब्ध करून देत आहेत हे आश्वासक होय.