नांदेड| येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ६ जुलै २०२३ रोजी दोन हजार झाडांच्या वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच अनुषंगाने रक्तदान व आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी मिशनचे दिपक कदम हे राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटक रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील नेते बापुराव गजभारे यांची उपस्थिती राहणार आहे.


या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघ, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पीएस बोरगांवकर, आरडीसी महेश वडदकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, तहसीलदार संजय वाडकर, मंडळ अधिकारी खिल्लारे, वनाधिकारी संदिप शिंदे, तलाठी सोलापुरे, विजयदादा सोनवणे, सुभाषदादा काटकांबळे, सुखदेव चिखलीकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.



तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त श्रामणेर दीक्षाभूमीच्या ‘धम्मसंकल्प’ परिपूर्तीसाठी दान पारमिता महासोहळा आयोजित करण्यात आला आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, त्रिसरण पंचशील, अष्टशील, दसशील अनुपालन, ध्यानसाधना आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. याच परिसरात तब्बल दोन हजार झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. याबरोबरच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आणि भोजनदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. ६ जुलै रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील डॉ. गंगाधर सोनकांबळे, प्रभु सावंत, प्रफुल्ल सावंत, किशोरदादा भवरे, सुभाषदादा रायबोले, मनिषभाऊ कावळे, डॉ. राजेश्वर पालमकर, माधवदादा जमदाडे, प्रशांत इंगोले, सुखदेव चिखलीकर, मंगेश कदम, कैलास सावते, भरत कानिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


तिसऱ्या सत्रात बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम आणि बौद्ध उपासक उपासिकांच्या धम्मसंकल्प दानपारमितेच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या अभिष्टचिंतनानंतर भिक्खू संघाची धम्मदेसनाही होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे जी.बी. सोनकांबळे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच हिंगोले, विनायक लोणे, विलास वाठोरे, प्रज्ञाधर ढवळे, राम सोनकांबळे, पी. एस. गजभारे, एल. एन. खंडेलोटे, गंगाधर वडणे, व्ही. एल. कदम, रोहिदास भगत, प्रा. बापुराव वाठोरे, पद्माकर सोनकांबळे, भगवान गायकवाड, एल. आर. कांबळे, सदानंद अंभोरे, दिलीप गजभारे, सिद्धार्थ थोरात, डॉ. गजानन ढोले, राहुल चिखलीकर, माधव चित्ते, धम्मदीप एंगडे, जयदीप नौबते, संतोष साळवे, रवी सोनकांबळे, चंद्रकांत ढगे, राजाराम व्यवहारे, आप्पाराव नरवाडे नागोराव नरवाडे आदींनी केले आहे.



