नांदेड| संस्कृति संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी बिलोली येथे भारतीय थलसेना दिवस हर्षे उत्साहात साजरा करण्यात आला.


आयोजित भारतीय थलसेना दिवसाच्या कार्यक्रमात कडेट्सनी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. आश्वारोहण करून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कवायती प्रभाविपणे सादर करून आपले साहस दाखवले.कराटेच्या लक्षवेधी कवायती सादरीकरण केले.

यावेळी अशोका, वीर, सेना, आणि शौर्य या हाऊसने केलेल्या जागतिक पातळीवर आत्मनिर्भर भारत आणि, एक भारत श्रेष्ठ भारत,तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकसित भारत, मेक इन इंडिया, याचे कडेट्सनी तयार केलेल्या चित्र आणि नव निर्मितीचे ध्यास घेऊन लोकल फॉर व्होकल इ.स्पर्धेतून मुलांच्या कौशल्य निर्मितीला चालना देण्यात आली. थलसेना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख चेअरमन संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून . एस. एम. मोहनसिंग ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड. प्रमुख वक्ते म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तुरे, आणि कॅप्टन के. आर. कपाळे यांची उपस्थिती होती.



आजच्या थलसेना कार्यक्रमांस उपस्थित असलेल्या माजी सैनिक संघटना अंतर्गत, सुधाकर बंडेवार, सीएडी. एस. इ. राव, सुभेदार के. जयराम कॅप्टन दत्ता पोतंगले, सुभाष सागर, रमेश कांबळे, आर.व्हि. कोलकापूर, सुभेदार व्यंकट अनमूलवार, सुभेदार विनोबा उमारे, सुभेदार मेजर इरन्ना वाडेकर, कॅप्टन बळीराम या माजी सैनिकांचा प्राचार्य गिरीश आलूरकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात करण्यात आले.

थलं सेना दिवसाच्या निमित्त संस्थेच्या शिक्षण समन्वयिका सौ. श्रद्धाताई देशमुख यांनी वीर पत्नी शीतल संभाजी कदम. सुधा सुधाकर शिंदे.द्रुपता डुबूकवाड या तीन वीर पत्नीचा सैनिकी शाळा तथा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, क्षात्रतेज वार्षिक अंक देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे एम. एस मोहनसिंग यांनी सैनिकी क्षेत्रातील संधी आणि तयारी यासोबतच आपल्यातील क्षमता वाढवीत सक्षम होण्यासाठी गुणांची कॅडेट्सनी जोपासना करावी असा संदेश दिला. प्रमुख पाहुणे कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांनी अग्निवीर या क्षेत्राविषयीं, एन. सी. सी. च्या कॅडेट्स यांना सैनिक क्षेत्रातील महत्व सांगून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी कॅडेट्सनी सैनिकी शिस्त अधिक जपावी. स्वयंशासनातून आपलं व्यक्तिमत्व निर्माण होतं असतं विद्यार्थी दशेपासून सहनशीलवृत्ती आणि अनुशासित असावे अशी भावना व्यक्त केली.
मान्यवरांच्या हस्ते सैनिकी विद्यालयातील सुयश प्राप्त कडेट्सचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांची मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगातील कार्य कथध केले. यावेळी दादासाहेब देशमुख, संचालक श्री रोहित देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. जयंत जकाते, संस्था कार्यकर्ते आणि शिक्षक उपस्थित होते.

