HomeनांदेडAccident news : पुणेवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण...

Accident news : पुणेवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे येथे गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड परतीच्या प्रवासात असताना नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र उनकेश्वरजवळ आज दुपारी सुमारे 2.10 वाजता खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 48 होमगार्डांसह एकूण 50 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून 192 होमगार्ड पुणे येथे पाठविण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे होमगार्ड चार खाजगी ट्रॅव्हल्समधून चंद्रपूरकडे परतजात होते. त्यापैकीच MH-03 CP 3279 क्रमांकाची ट्रॅव्हल्स माहूर–उनकेश्वर मार्गावरून जात असताना, उनकेश्वरजवळील खड्डेमय कलवट पुलाजवळ ही दुर्घटना घडली.

या ठिकाणी ट्रॅव्हल्सच्या पुढे जाणाऱ्या एका कारचालकाने अचानक ब्रेक घेतल्याने वाहनाचा वेग कमी झाला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; मात्र समोरची कार अचानक मंदावल्याचे लक्षात येताच चालकाने जोरात ब्रेक लावले. त्यामुळे ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटून सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात ट्रॅव्हल्स कोसळली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सपोनि गंगाधर गायकवाड, पो.कॉ. मनीष ठाकरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे तसेच किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी मळघणे यांनीही घटनास्थळी भेट देत बचावकार्याचे नेतृत्व केले. याशिवाय सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि जाधव, पो.कॉ. यादवजी पिसाळ, शाम माने, राजू डांगे तसेच उनकेश्वर, बोथ तांडा व उमरी बाजार येथील नागरिकांनी युद्धपातळीवर बचावकार्याला मदत केली.

सर्व जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उमरी (बा.) येथे दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले. या अपघातात सुरज गेडाम (वय 32, रा. परोटी, जि. चंद्रपूर) हा होमगार्ड ट्रॅव्हल्सखाली अडकला होता. त्याला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे उनकेश्वर–माहूर मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments