हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील महात्मा फुले सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगरचे माजी सरपंच तथा श्री परमेश्वर देवस्थान मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.


यावेळी बोलताना महाविरचंद श्रीश्रीमाळ म्हणाले की, महिलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काळात महिलांना शिक्षण देणे ही क्रांती होती. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली नसती, तर आज महिलांना उच्च पदावर विराजमान होता आले नसते.
ते पुढे म्हणाले की, आज देशातील विविध उच्च पदांवर महिला कार्यरत आहेत, याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जाते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, ज्येष्ठ नागरिक रामराव सूर्यवंशी, परमेश्वर वानखेडे, माजी सदस्य सुभाष शिंदे, माळी समाजाचे दिगांबर काळे, मारोती बळीराम हेंद्रे, मायंबा होळकर, दत्ता काळे, श्याम ढगे, बबलू काळे, गणेश दळवे, प्रवीण कोमावार, नगरसेवक भारत डाके, मंदिर समितीचे संचालक संजय माने, विलास वानखेडे, दत्तात्रय दळवे, मनोहर जाधव, मारोती हेंद्रे, रामदास हेंद्रे, वाघमारे, कपिल हेंद्रे, श्याम मंडोजवार, विजय शिंदे, परमेश्वर दळवे आदी मान्यवर व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी नुकत्याच झालेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले माळी समाजाचे भारत डाके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगांबर काळे यांनी केले, तर आभार सुभाष शिंदे यांनी मानले.


