Savitribai Phule : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज देशाच्या उच्च पदावर – महाविरचंद श्रीश्रीमाळ
हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील महात्मा फुले सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगरचे माजी सरपंच तथा श्री परमेश्वर देवस्थान मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाविरचंद श्रीश्रीमाळ म्हणाले की, महिलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काळात महिलांना शिक्षण देणे ही क्रांती होती. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली नसती, तर आज महिलांना उच्च पदावर विराजमान होता आले नसते.
ते पुढे म्हणाले की, आज देशातील विविध उच्च पदांवर महिला कार्यरत आहेत, याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जाते. त्यांच्या विचार...
