नवीन नांदेड। नावामनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, हातगाडे यांना गुरूवार बाजार या ठिकाणी पर्यायी जागा असतांनाही मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व मालमत्ता धारकाने केलेल्या पायरा व ओटे अतिक्रमण केल्याने म दैनंदिन जाणारी येणारी वाहतूक खोळ बंळत असल्याने व नागरीकांना होत असलेला त्रास पाहता सिडको क्षेत्रीय कार्यालय, मनपा अतिक्रमण पथक, व ग्रामीण पोलीस स्टेशनने २१ जुन रोजी केलेल्या कार्यवाही मध्ये अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला आहे.


नावामनपचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते अण्णा भाऊ साठे सिडको दरम्यान भाजीपाला,फळ विक्रेते,हातगाडे यांच्या सह विविध प्रतिष्ठान यांनी रस्त्यावर माल लावून जाणाऱ्या येणारा वाहतूकीस अडथळा निर्माण केले, यामुळे वाहन धारकासह नागरिक शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन नाहक त्रास व छोटे मोठे अपघात होत असल्याने अनेक नागरीकांनी या बदल तक्रारी केल्या होत्या.


अखेर २१ जुन रोजी मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,कार्यालयअधिक्षक विलास गजभारे, ईमारत निरीक्षक प्रभु गिरीम, वसुली लिपीक सुधीर कांबळे, संतोष भदरगे, संदीप धोंडगे, रविंद्र पवळे, व अतिक्रमण पथकाचे वसंत हटकर व राजकिरण देवणे,अनिल कांबळे,राजु माने, शैलेश कर्मचारी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार कांबळे,पोहेका शेषराव शिंदे यांनी सिडको मुख्य रस्त्यावर केलेले भाजीपाला, फळ फुल,विक्रेते यांच्या सह अनेकांनी केलेले अतिक्रमण काढून पुनश्च बसल्यास दंडात्मक कार्यवाही करून हातगडे,टपरी व संबधित व्यवसाय साठी रोडवर ठेवण्यात येणाराय वस्तू जप्त करण्याचा ईशारा सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांनी दिला आहे. गुरूवार बाजार मध्ये पर्यायी व्यवस्था असतांनाही संबधित विक्रेते हातगाडी चालक यांनी केलेले अतिक्रमण काढल्याने रस्ताने मोकळा शाश्वस घेतला आहे.




