नांदेड l दिवाळी हा आनंदाचा, ऐक्याचा आणि वाटचालीचा सण आहे. समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे या भावनेतून ‘डॉक्टर्स ग्रुप’ च्या वतीने शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला.


या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, साखर, डाळी, फराळ साहित्य आदी वस्तूंचा समावेश असलेले शिधा किट देण्यात आले. दिवाळीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे सण साजरा करू न शकणाऱ्या कुटुंबांना थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


उपजिल्हाअधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या सायाळ वाडी तांडा( छोटा व मोठा), देशमुख वाडी तांडा ह्या हदगाव तालुक्यातील तांड्या तील परिस्थिती अतिवृष्टीमुळे अत्यंत बिकट आहे,आणि येथील सगळे नागरिक अल्प भूधारक व शेतमजूर व आदिवासी आहेत. निसर्गाच्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे दिवाळी सारख्या सणावर सुद्धा दुःखाचे सावट आहे. “डॉक्टर्स ग्रुप” च्या माध्यमातून “दिवाळी शिधा” द्यायचा असेल तर अश्या ठिकाणी द्या असा सल्ला दिला.


या उपक्रमात पुढाकार घेतलेले डॉ. दत्ता मोरे यांच्यासह डॉक्टर्स ग्रुप मधील डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. विवेक टापरे, बंजारा समाजाचे कार्यकर्ते श्री. रामराव चव्हाण, मंडळ अधिकारी श्री. रेड्डी, वैद्यकीय अधिकारी,शिक्षक, स्वयंसेवक व सरपंच, पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरील उपक्रमाला दंत वैद्यकीय, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष करून महिला डॉक्टर्स नीही मोठा आर्थिक आधार दिला आहे. आणि मोठया प्रमाणात सर्व डॉक्टर्स नी या उपक्रमाचे सामाजिक भान लक्षात घेऊन मदत केली आहे. सगळ्या डॉक्टरांनी केलेल्या मदतीचे आम्ही फक्त वाहक आहोत असं आवर्जून डॉ. दत्ता मोरे यांनी भावुक होऊन नमूद केले.
समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून, अशा सामाजिक उपक्रमातून ‘डॉक्टर्स ग्रुप’ सतत योगदान देत असल्याचे महसूल प्रशासनाने नमूद केले.सर्व सर्व गावकर्यांनी आमच्या गावा सारख्या अत्यंत दुर्गम भागात ” दिवाळी शिधा ” देऊन आमची दिवाळी तुम्ही सर्वांनी गोड केलात असे भावोउदगार काढले.


