Doctors Group” ; डोंगराळ भागात पोहोचला दिवाळीचा शिधा –” डॉक्टर्स ग्रुप ” च्या हातून आनंद वाटप
नांदेड l दिवाळी हा आनंदाचा, ऐक्याचा आणि वाटचालीचा सण आहे. समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे या भावनेतून 'डॉक्टर्स ग्रुप' च्या वतीने शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, साखर, डाळी, फराळ साहित्य आदी वस्तूंचा समावेश असलेले शिधा किट देण्यात आले. दिवाळीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे सण साजरा करू न शकणाऱ्या कुटुंबांना थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
उपजिल्हाअधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या सायाळ वाडी तांडा( छोटा व मोठा), देशमुख वाडी तांडा ह्या हदगाव तालुक्यातील तांड्या तील परिस्थिती अतिवृष्टीमुळे अत्यंत बिकट आहे,आणि येथील सगळे नागरिक अल्प भूधारक व शेतमजूर व आदिवासी आहेत. निसर्गाच्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे दिवाळी सारख्या सणावर ...
