नांदेड| येत्या “एक आक्टोबर,जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त” उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेड व निर्मल रिहॅबिल्टेशन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने दि.5 आक्टोबर, रविवारी सकाळी ठिक साडेदहा वाजता नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. आनंदरावजी बोंढारकर यांच्या शूभ हस्ते उद्घाटण झाल्यानंतर हे शिबीर संध्याकाळी पाच वाजे पर्यंत चालणार आहे.


शिबीरात फक्त नाव नोंदणीं केलेल्या रूग्णाचीच तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरार्थ्यांची नाव नोंदणीं मोफत आहे.नाव नोंदणीं बहिरेपणा, श्रवण तथा भाषा,वाचा तज्ञ डाॅ.श्वेता शिंदे (9137314741) व डाॅ.क्षितिज निर्मल नायर हाॅस्पिटल मुंबई,नांदेड (8408803929) तसेच आयोजक डाॅ.हंसराज वैद्य (9423138385)तथा प्रभाकर कुंटूरकर (9604060902) यांच्या या भ्रमण ध्वनीवर करता येणार आहे.


शिबिरार्थ्यांनी विशेषतः संधी वात, बहिरेपणा,चक्कर येणे,तोत्रे पणा, कानांत वेगवेगळे आवाज येणे, मधूमेही, रक्तदाब तथा दमादि असलेल्या जुनाट रूग्णांनी आपापली औषधी खूराक नियमित पणे नाष्ता करून घेऊन यायचा आहे.येताना आपापल्या आजाराच्या तज्ञांनी दिलेल्या सल्यांचा पूर्व ईतिहास तथा गोशवारा अर्थात फाईल्स आपल्या बरोबर घेऊन यायच्या आहेत.


बहिरेपणा,श्रवण, व भाषा तथा वाचा विषज्ञांनी तपासणी अंती ठरविलेल्या तथा योग्य ठरविलेल्या रूग्णांनीं निवड केलेल्या नामांकित कंपन्यांच्या डिजिटल व सुक्ष्म यंत्रावर पन्नास टक्के सरळ सूट,दोन वर्षा पर्यंत बिघडल्यास विनामुल्य दुरूस्तीची हमी,मोफत बॅटरी दोष चाचणी व दुरूस्ती योग्य असल्यास दुरूस्तीची हमी, रिचार्जेबल बॅटरी युक्त जर्मन टेक्नाॅलोजी वर अधारित नामांकित कंपन्यांचे सुक्ष्म कर्ण यंत्र बसविण्याची संधी,श्रवण दोष तज्ञाचा सल्ला आदि बैशिष्ट्यपूर्ण हे शिबिर असणार आहे. तेव्हा उ.म.प्रा.वि. फेस्काॅम नांदेड विभागातील सर्व अतिवृष्टीने पिडित गरजवंत रूग्णांंनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहान अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य तथा समस्त आयोजकांनी केले आहे.



