हदगांव, शेख चांदपाशा| ई – पीक पाणी दरम्यान ऐप वरून पिकाची नोंदणी करताना शेतकऱ्यांना खुप अडचणी येत आहेत. या अडचणी तत्काळ दूर कराव्यात किंवा जुन्या पद्धतीनेच तलाठी मार्फत पिकाची नोंद घ्यावी. अशी मागणी हदगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.


शासनाचा हा कार्यक्रम नाविन्यपूर्ण असला तरी प्रत्यक्षात काही सामान्य शेतक-या करिता तो मोठा त्रासदायक ठरत आहे. स्थानीय संबंधित प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून ह्या संबधी कोणतीही माहिती मिळत नाही. शेतकरी स्वतःच्या मोबाईल फोन द्वारे पिकाची नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. जसे की पिक पाहणी पूर्ण केल्यानंतर काही तरी चुकीचे झाले आहे. असा मेसेज मोबाईलवर दिसतो… हेक्टर क्षेत्र असूनही अपवर चूकीची नोंद दिसते…. सर्वप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी यशस्वी झाली असा मेसेज सर्व प्रक्रिया करून ही मात्र सातबारावर पिकाची नोंद होत नाही.


असे अनेक शेतकऱ्यानी सांगीतले सर्व करूनही शेतकरी सापडला नाही असा लाल मेसेज दिसतो. संबंधित खाते रजिस्टर होत नाही कृपया पुन्हा प्रयत्न करा असा मेसेज येतो. शेतकरीच शेतामध्ये उभा राहून नोदणी करत असताना सुद्धा तुम्ही शेतापासून दूर आहात असा मेसेज दिसतो. त्यामुळे या पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. जुन्या पद्धतीने पिकाची नोंद घेण्याची यावे असे मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.


आमदार व खासदार यांनी लक्ष घालवे
पिक पाहणीतील ॲपवर तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अन्यथा जुन्या पद्धतीने नुसार पिकाची नोंद घेण्याचे असे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावे अशी विनंती विद्यमान आमदार व खासदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.



