हिमायतनगर| पेरकेवाड समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व शासकीय नोकरीस लागलेल्या युवकाचा गुणगौरव सोहळा भोकर येथे 26 आॅक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या भव्य अशा पेरकेवाड समाजाच्या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन शासकीय गुत्तेदार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव उल्लेवाड यांनी केले आहे.


हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात भोकर येथे संपन्न होणार असलेल्या पेरकेवाड समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व शासकीय नोकरी लागलेल्या नागरिकांचा सत्कार सोहळा. या भव्य कार्यक्रमासाठी आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या महत्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. अक्कलवाड हे होते. जिल्हास्तरीय पेरकेवाड समाजाचा हा गुणगौरव सोहळा संपन्न होतो आहे. या भव्य अशा या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उल्लेवाड यांनी केले.


पुढे बोलताना गोविंदराव उल्लेवाड म्हणाले की,पेरकेवाड समाज हा अल्पसंख्याक असून शेती हा मुळ व्यावसाय आहे. आता कुठे मुले शिकत असून स्पर्धा परीक्षा देत आहेत. पेरकेवाड समाजातील समाजातील गुणवंत मुले,मुली, यांचा सत्कार व विविध खात्यात नोकरीस लागलेले युवक, कृषी,क्रिडा, व्यावसायिक, अन्य क्षेञातील सन्मान मिळालेल्याचा भव्य सन्मान सोहळा भोकर येथे 26 आॅक्टोबरला संपन्न होत आहे. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पेरकेवाड समाज उपस्थित राहणार आहे. तेव्हा हिमायतनगर तालुक्यांसह सर्व ठिकाणच्या पेरकेवाड समाज बांधवाने कामधंदे एक दिवस बाजूला ठेवून भोकर येथे गुणवंताच्या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हानही कार्यक्रमाचे संयोजक शासकीय गुतेदार गोविंदराव उल्लेवाड यांनी केले आहे.



यावेळी राष्र्टपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी आलेवाड, पेरकेवाड समाजाचे माजी अध्यक्ष गजानन तिपनवार, संचालक दिनेशजी दुमनवार अॅड. सुरेश पन्नसवाड, पो.नि. राजेश डाकेवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेश शिंगनवाड, मा.शिक्षक बालाजी सुब्बनवाड, प्रविण भुरेवार, सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार,प्रकाश दादा बच्चेवार, माजी सरपंच बालाजी उल्लेवाड, मारोती बेरदेवाड, अॅड. सुरेश पन्नसवाड, पो.नि. राजेश डाकेवाड, गजानन तिफनवार, बालाजी सुब्बनवाड, अशोक अनगुलवार तंटामूक्ती अध्यक्ष संभाजी अक्कलवाड, मारोती अक्कलवाड, कार्यक्रमाचे सूत्र संचलन व अभार सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार यांनी मानले.



