नवीन नांदेड l राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा दक्षिण ग्रामीण मंडळ यांच्या वतीने धनेगाव येथे रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते,यावेळी महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या वाढदिवसा निमित्त नांदेड दक्षिण भाजपा ग्रामीण मंडळ तर्फे महारक्तदान शिबिर धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित महानगर अध्यक्ष माजी आ.अमर राजुरकर,तालुका अध्यक्ष विश्वांभर पाटील शिंदे, महानगर सरचिटणीस शितलभाऊ खांडील, सोशल मिडिया प्रदेश सदस्य राज यादव,अक्षय अमिलकंठवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,गंगाप्रसाद काकडे, महानगर उपाध्यक्ष जयप्रकाश येवले सरपंच पिंटु पाटील शिंदे अ. जा. मोर्चा तालुका अध्यक्ष रमेश वाघमारे,गणेश काकडे,शैलेंद्र ठाकुर, मारोती पुयड, गजानन ऊबाळे, सचिन कदम, नरबा जाधव, दिलिप कोल्हे, व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व परिसरातील रक्त दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन नांदेड रक्तपेढी यांच्या वतीने डॉ.सोनाळे,एआर,सहाय्यक गजानन मोरे, सध्या कदम,तुप्पा आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र धनेगाचे डॉ.अमित रोडे व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळातील वाजे गाव गटातील माजी पंचायत समिती सदस्य सय्यद युसूफ यांनी महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला.


या रक्तदान शिबीर मध्ये एकुण 55 जणांनी रक्तदान केले.सकाळपासुन मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, यावेळी रक्तदान दात्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.


