देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून, सेवा देण्यात भेदभावचालवीत जवळच्या लोकांना अनुपस्थित असतांना रक्कम तर सर्वसामान्य लोकांना व्यक्ती स्वतः उपस्थित नसल्याचे कारण सांगून चालढकल केली जात आहे. सर्वांना समान वागणूक देण्यात यावी यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी येथे देण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे.


देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे कार्यरत असलेल्या डाक घर मधून परिसरातील जनतेनी पैसे रक्कम काढण्यासाठी गर्दी करत आहेत. येथील पोस्ट मास्तर या संधीचा फायदा घेऊन काही जवळील लोकांचा माणूस नसताना ओटीपी वर रक्कम देत आहेत, तर दुसऱ्या व्यक्तीला माणुस स्वत उपस्थित पाहिजे म्हणून हाकलून टाकत आहेत. अश्या प्रकारे मर्जीतील लोकांना भरमसाठ रक्कम देवून सर्वसामान्य नागरिकांना दुजाभाव करुन मनमानी कारभार चालवीत आहे, अश्या स्वार्थी पोस्ट मास्तरची उचलबांगडी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतुन होत आहे.


शहापूर परिसरातील जवळपास दहा पंधरा गावाचा संपर्क शहापूर येथील डाक कार्यालयात असुन, काही गावाना वाहनांची सोय उपलब्ध नसल्याने पैदल चालत नागरिक येत असताना वेळ अभावी डाक घर मधील पैसे वाटप करण्याचे उद्दिष्ट संपल्याने जनतेला तोड पांढरे करून परत जाण्याची वेळ येते आहे. दररोज किती तरी जनता शहापूर येथील डाक कार्यालयात ये जा करण्यात गळून पडतात. मात्र येथील मुजोर पोस्ट मास्तर अवाच्या सवा रक्कम देवून टाकून मोकळे होतात.


तसेच संबधित व्यक्तीला ओटीपीवर रक्कम काढून देतात. तर तेच दुसऱ्या खातेधारकाना स्वत असेल तरच रक्कम देता येते अन्यता देता येत नसल्याचे कांगावा करतात. तेव्हा आशा मुजोर पोस्ट मास्तरची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी आणि सर्वांना समान वागणूक देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी रक्कमेसाठी येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागत असलेल्या नागरिकांनी केली आहे.



