Shasapur post office ; शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार; सेवा देण्यात भेदभाव
देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून, सेवा देण्यात भेदभावचालवीत जवळच्या लोकांना अनुपस्थित असतांना रक्कम तर सर्वसामान्य लोकांना व्यक्ती स्वतः उपस्थित नसल्याचे कारण सांगून चालढकल केली जात आहे. सर्वांना समान वागणूक देण्यात यावी यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी येथे देण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे.
देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे कार्यरत असलेल्या डाक घर मधून परिसरातील जनतेनी पैसे रक्कम काढण्यासाठी गर्दी करत आहेत. येथील पोस्ट मास्तर या संधीचा फायदा घेऊन काही जवळील लोकांचा माणूस नसताना ओटीपी वर रक्कम देत आहेत, तर दुसऱ्या व्यक्तीला माणुस स्वत उपस्थित पाहिजे म्हणून हाकलून टाकत आहेत. अश्या प्रकारे मर्जीतील लोकांना भरमसाठ रक्कम देवून सर्वसामान्य नागरिकांना दुजाभाव करुन मनमानी कारभार चालवीत आहे, अश्या स्वार्थी पोस्ट मास्तर...
