नवीन नांदेड l पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी राबवला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.


हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व हद्दीतील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळता याव्यात म्हणून ग्रामीण पोलिसांनी वाहणावर सी.सी.टी.
व्ही.कॅमेरा बसवीला आहे. या कॅमेऱ्या मुळे गाडी ज्या ज्या ठिकाणी पेट्रोलिंग करेल फिरेल ते सर्व दिवसभराची हद्दीतील व्हिडिओ रेकॉर्डिंग गाडीमध्ये सेवा असेल.


कायदा सुव्यवस्था बिघडू पाहणारे समाजकंटक, रोडवर झगडा भांडण करणारे, रोडवर अस्ताव्यस्त गाड्या लावून ट्राफिक जाम करणारे वाहनधारक, मिरवणूक मोर्चा मध्ये गोंधळ घालणारे आंदोलक, रस्त्यावर अतिरिक्त जमाव-जमविणारे इसम सदर गाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हू मध्ये रेकॉर्ड केले जाणार आहे.


सदर रेकॉर्डिंग पाहून गोंधळ घालणारे, पळून जाणारे, दंगल करणारे आरोपी यांची ओळख पटवून त्यांची नावे निष्पण करून पुढील कायदेशीर कारवाई करता येणार आहे.तसेच सदरचे फुटेज हे इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणून न्यायालयामध्ये सादर करता येईल.
सदर पोलिसाच्या गाडीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांच्या मनात वचक निर्माण होणार असून आपण सदर कॅमेरा मध्ये टिपले जाणार याची जाणीव राहील.

विशेष करून रोडच्या काठावर बसून दारू पिणारे व पोलिसांना पाहून पळून जाणारे या पुढे कॅमेऱ्यात टिपले जाणार आहेत. या उपक्रमामुळे मार्केटमधील महिला नागरिक शाळकरी मुले मुली सुरक्षित व बिंदास्त रहातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस वाहन हे फक्त आतापर्यंत पेट्रोलिंग साठी व कुठे जाण्या येण्यासाठी वापरले जात होते.मात्र पोलीस वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यामुळे गाडी ज्या ज्या ठिकाणी फिरेल तेथील सर्व चित्रीकरण यामध्ये येणार आहे व या चीत्रीकरणाचा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणून पण वापर केला जाणार आहे.
हा कॅमेरा पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करेल.या सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्याला इंटरनेटची सुविधा जोडलेली असल्यामुळे या कॅमेरात चित्रित होणारे सर्व दृश्य हे पोलीस स्टेशन येथील टी.व्ही वर व पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईल वर प्रत्यक्ष पहाता येतील. या मुळे हद्दीत कुठे काय चालू आहे परिस्थिती कशी आहे हे ठाणेदार यांना स्वतःच्या मोबाईल वर कुठेही पहाता येईल. या कॅमेऱ्याला लाऊड स्पीकर व माइक असल्यामुळे मोबाईल वरून बोलल्यास गाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सूचना देता येतील, तसेच गाडीच्या आजूबाजूला काय बोलणे सुरू आहे याचा स्पष्ट आवाज ठाणेदार यांचे मोबाईल पर्यंत पोहोचेल,या वाहणा वरील कॅमेरा मुळे कानून के हात लंबे होते है, या सोबतच कानून कि आखे भी दुरतक देखतीहै चा परिचय होत आहे.


