नांदेड| वजिराबाद पोलीस ठाण्यानंतर्गत दोन विधीसंघर्ष बालकाडुन घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आला असून, त्यांच्याकडून गुन्हयातील संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात रोख रक्कम ४ लक्ष ८० हजार रुपये व १५ ग्राम सोने व अर्घाकीलो चांदी जप्त केली आहे. हि कार्यवाही वजिराबाद गुन्हे शोध पथकाने केली असून, वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना पोस्टे हददीतील घरफोडी जबरी चोरी व चोरीचे गुन्हयातील आरोपीतांची माहिती काढुन गुन्हे उघड करण्याबाबत आदेशीत केले होते. दिनांक 24.02.2025 रोजी स्टे.डा क्र 23 वेळ 14.14 वाजता पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचे आदेशांन्वये आम्ही पोलीस स्टेशन वजिराबाद हद्दीत पो.उप.नि विक्कड व डि.बी पथकाचे अमलदार असे पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत होते.

दरम्यान गुप्त बातमीदार मार्फत पो.स्टे वजिराबाद गुरन 579/24 मधील घरफोडीच्या गुन्हयातील दोन विधीसंघर्ष बालक हे करबला रोड दिवाणी बोडी इतवारा हददीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून 14.40 वा सादर ठिकाणी महिला अमलदार याचेसह पोलीस पथक पोचले असता, एक विधीसंघर्ष बालक व बालीका घरी मिळुण आल्याने त्यांना त्यांच्या आई-वडीलासमोर गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हयातील चोरी केलेला १) १६०००/- पाच ग्राम वजनाचे गळयातील सोन्याचे हार (गलसर), २) १०,०००/- एक जोड तिन ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे झुबंर, ३) ८४००/- एक जोड अडीच ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील वाली, ४) १५०००/- एक जोड साडेचार ग्राम वजनाची सोन्याचे बांगडया, ५) १८०००/- एक जोड अर्धा किलो वजनाचे चांदीचे पायातील वाडे, ६) ४,८०,०००/- नगदी रोख रक्कम असा एकुण – ५ लक्ष ४७ हजार ४०० रुपयाचा मुददेमाल हा त्यांचे आई वडीलांनी पोलीस ठाण्यात आणुन दिला आहे. सदर गुन्हयातील पुढील तपास पो.उप.नि.श्री व्हि.ए. बिक्कड पो.स्टे. वजिराबाद हे करीत आहे.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड सुशिलकुमार नायक, उप विभाग पोलीस अधिकारी नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड, राजु वटाणे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड, श्री.व्ही.ए विक्कड,. पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे वजिराबाद नांदेडचे पोलीस अंमलदार पोहेकॉ.नंदे, पोहेकॉ. मठपती, पोहेकॉ.नागमवाड, पोकों. शेख इम्रान, पोकॉ.रमेश सुर्यवंशी, पोकॉ. गंगुलवार, पोकॉ. भाऊसाहेब राठोड, पोकॉ. पोकॉ. वावरी, पोकॉ. साखरे, मपोकॉ.कोरेगाव यांनी केली आहे. पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.