नांदेड| गावठी पिस्टल बाळगुन तीची चोरटी विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल, 07 जिवंत काडतुस असा एकुण 1,22,800/- रुपयाचा ऐवज जप्त केलं आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना पोस्टे हददीतील घरफोडी जबरी चोरी व चोरीचे काढुन गुन्हे उघड करुन व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ईसमाची माहिती काढुन त्यांचे वर योग्य कार्यवाही करणे कामी आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दिनांक 27/02/2025 रोजी पोलीस पथक रेल्वे स्टेशन नांदेड येथे आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली.

हिंगोली गेट जवळील फटाका ग्राऊंड मधील लिंबाच्या झाडा खाली दोन ईसम थांबलेले असुन, त्यांचेकडे गावठी पिस्टल असुन ते विक्री करण्यासाठी थांबलेले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारुन आरोपी रोहित नरेद्र ताटीपामुलवार, वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. आंबड ता. आंबड जि. जालना हा. मु. भावेश्वरनगर चौफाळा नांदेड, भागवत विष्णु डोंगरे, वय 30 वर्षे व्यवसाय मंदीरात सेवक रा. बाजीउमर ता. जि. जालना हा. मु. भावेश्वरनगर चौफाळा नांदेड यांना ताब्यात घेऊन त्या दोघांची अंगझडती घेतली.

अंगझडतीमध्ये तीन गावठी पिस्टल, सात जिवंत काडतुस असे विनापरवाना, बेकायदेशिररित्या विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे ताब्यात बाळगलेले एकूण 1,22,800/- मुद्देमाल मिळुन आले. म्हणुन त्यांचे विरुध्द फिर्यादी नामे शिवसांब मठपती पोहेकों. पो. स्टे. वजिराबाद यांचे फिर्याद वरुन पो. स्टे. वजिराबाद गु. रु. न. 85/2025 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास परमेश्वर कदम पोलीस निरीक्षक पो.स्टे. वजिराबाद हे करीत आहे.

सादर कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशिलकुमार नायक उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड, राजु वटाणे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड पोलीस अमंलदार पोहेकॉ. नंदे, पोहेकॉ. मठपती, पोकॉ. शेख इम्रान, पोकॉ. रमेश सुर्यवंशी, पोकॉ. गंगुलवार, पोकॉ. भाऊसाहेब राठोड, पोकॉ. बावरी, पोकॉ. साखरे, पोकॉ.पवार यांनी केली आहे.पोलीस ठाणे वजिराबाद पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.