उस्माननगर |उस्माननगर येथील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पाणी मिळावे. गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी या उदात हेतूने उस्माननगर शिराढोण व भुत्याचीवाडी अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना अंमलात आणली..,पण अनेक वर्षे होऊन ही उस्माननगर येथील पाणी टंचाई अद्याप हटेना…. अन् योजना असून पाणी कुठेच दिसेना…! अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.


कंधार तालुक्यातील उस्माननगर गाव म्हणले की, येथील वीस पंचवीस वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. पाणी टंचाईचे गाव म्हणून मराठवाड्याला सुपरिचित असलेले गाव. या गावात मुलगी द्यायचे झाले , तर खुप विचार करावा लागत असे., नागरिकांना रात्र असो की दिवस अगोदर पाण्याची चिंता पडतं होती. सगे सोयरे आल्यावर सोयरा ज्यास्त दिवस राहत नसे. उस्माननगर येथे नागरिकांना तीन चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असे. कोसोदूर ची पायपीट करावी लागत असल्याने स्थानिक वृत्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर शासनाने टॅकर ची तात्पुरती सोय म्हणून टँकर ने पाणी पुरवठा करण्यात आली.

त्यावेळी प्रत्येकांच्या घरी मोठ मोठे ट्रम , टाक्या , प्लास्टिक पाईप यांच्या मुळे रस्त्यावर गर्दीच गर्दी व्हायची. चालत्या टॅकरवर चढून पाईप टाकण्याची गडबड गोंधळ असायची. ज्यांच्याकडे दम…त्यांनांच पाणी मिळत असे. अशा या थरारक पर्वात उस्माननगर येथील नवतरुण सह महीलांचा पाणी टंचाईत बळी गेला. तिव्र पाणी टंचाई काळत विहीरीचे पाणी शेदताना तोल जाऊन तर भर उन्हाळ्यात पाणी आणताना बळी गेला आहे. ” सत्यमेव जयते ‘” या सलमान खान यांच्या टि.व्ही शो मध्ये पाणी टंचाईचे दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सतत पाठपुरावा करून तत्कालीन आमदार यांनी संयुक्तपणे पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. पण त्या योजनेचा गावकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तीन गावांसाठी संयुक्त पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली. पण जीवन प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करून पाठ फिरवली आहे.

कंधार तालुक्यातील उस्माननगर हे गाव बाजारपेठेचे व ज्यास्त लोकसंख्येचे गाव आहे. या गावात अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचे संकट उभे असते. गावात पावसाळ्यात व हिवाळ्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विहीरीला आडाला बोअरला पाणी असते. नंतर मार्च नंतर जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यावर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते. कोट्यावधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना अंमलात आणली. गावकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य टाकी उभारली आहे. योजनेचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ..

जीवन प्राधिकरण वरिष्ठ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टाकी जवळील रुमची व्यवस्था बिकट झाली आहे.याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीची पुर्णावृत्ती व्होऊनये यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने लक्ष द्यावे. मागील पाणीटंचाई काळात उस्माननगर येथे सात ते आठ जणांचा बळी गेला. कोट्यावधी रुपयांची पाणीपुरवठा योजना केवळ नावालाच उस्माननगर येथील नागरिकांनी सुशिक्षित आणि हुशार समाज उपयोगी कार्ये करणाऱ्या लोकप्रतिनिधी निवडून दिले पण लोकप्रतिनिधीत या अत्यावश्यक असणाऱ्या पाणीटंचाईकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही. पुढील महिन्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असणारा रमजान ईद सुरुवात होणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी रमजान पूर्वी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी करावी .जाफर सय्यद ( सामाजिक कार्यकर्त्या)