नांदेड| जिल्हातील दहा तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण औषध उपचार मोहीम दि. 10 फेब्रुवारी पासून राबविण्यात येत आहे. आज दि. 12 फेब्रुवारी रोजी बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील शाळेमध्ये सकाळी विद्यार्थी यांना गोळ्या खाऊ घालण्यात आल्या.


काही विद्यार्थी यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने लगेच उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.मा. राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी नांदेड, मा. मिनल करणवाल मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना मा. डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी माहिती दिली.

लगेच संध्याकाळी मा. डॉ. संगीता देशमुख यांनी उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट दिली. सर्व बालकांची आस्थेवाईकपणे चौकशी व विचारणा केली. सर्व बालकाची तबेत चांगली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही व तेथील डॉक्टर यांना योग्य तो उपचार करण्यास डॉ. देशमुख यांनी सांगितले. या गोळ्या संपूर्णपणे सुरक्षित आहेत. जेवण करून घावे.

यावेळी डॉ गणपत वाडीकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, हत्तीरोग कर्मचारी गंगाधर तोटावार, कुंडलवाडीचे आरोग्य सहाय्यक मुंडे,गणेश जगताप आदी कर्मचारी उपस्थित होते.
