हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते होकार राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम – इंदिरानगर येथिल साई मंदिरात मागिल सात दिवसा पासुन अखंड साईनाम सप्ताह व साईसच्चरित्र ग्रंथाचे पारायण सुरू होते त्या सप्ताहाची सांगता आज हभप आनंदराव महाराज हातलेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होवुन तद्नंतर महाप्रसादाच्या पंगतीला सुरूवात होणार असुन रात्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.


सरसम – इंदिरानगर येथे साईभक्त मारोतराव मोरे यांच्या माध्यमातुन ग्रामस्थ, साईभक्तांच्या सहकार्याने गेली ३९ वर्षा पासुन अविरत पणे साईभक्तीचा महायज्ञ सुरू आहे, माघ महिण्यातील सप्तमी पासुन सप्ताहास सुरूवात होवुन पौर्णिमेला सांगता होते, नेहमी प्रमाणे यंदाही अखंड साईनाम सप्ताहाच आयोजन दि. ४ फेब्रुवारी पासुन करण्यात आल होत, त्याची आज हभप आनंदराव महाराज हातलेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे, काल्याच्या किर्तनानंतर दुपारी महाप्रसादाला सुरूवात होणार असुन रात्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेण्याच आवाहन साईभक्त मारोतराव मोरे, साईदिप मोरे, साईभक्त ग्रामस्थां कडुन करण्यात आल आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभवी साईभक्त, ग्रामस्थ, तरूण स्वयंसेवक परीश्रम घेत आहेत.


सप्ताहात प्रत्येक दिवशी, हभप प्रविण महाराज पार्डीकर यांच्या गोड वाणीतुन शिव महापुराण कथा, काकडा भजन कृष्णा महाराज, राम महाराज आळंदिकर, अखंड साईनाम, विणा पारायण, हरीपाठ विनोद महाराज, भोंगाळे महाराज, संजय महाराज, हरीकिर्तन, भजन, आदी भरगच्च कार्यक्रमाच नियोजन होत, व्यास्पिठाची सेवा हभप शिवाजी महाराज वडगावकर यांचेकडे आहे. गायनाचार्य गोटु महाराज यांच्या कंठाने भक्तांना मंत्र मुग्ध केले तर, मृदंगाचार्य दत्ता महाराज सोलव यांच्या मृदंग वादनाने भुरळ घातली.




