कृषीनांदेड

Inspection of crop damage of 20 villages ; भर पावसात वीस गावाच्या पीक नुकसानीची पाहणी पूर्ण शेत नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर -NNL

श्रीक्षेत्र माहूर| राज ठाकूर। माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगफुटी अतिवृष्टी सारखा पाऊस पडल्याने पैनगंगा नदी पात्र दुथडी भरून वाहत पुलावरून पाणी गेल्याने खेड्यापाड्यातून नदीला मिळालेले सर्व नाले काठोकाठ भरले तसेच पाणी उतरल्यानंतर शेतात गेलेल्या पाण्याने परतीत संपूर्ण जमीन खरडून नेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार तहसीलदार किशोर यादव यांनी भर पावसात सोमवार दि,2 रोजी माहूर तालुक्यातील वानोळा सर्कल वाई बाजार सर्कल मधील वीस गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केल्याची तत्परता दाखविल्याने नागरिकासह शेतकऱ्यातून तहसीलदार किशोर यादव यांचे अभिनंदन होत आहे.

माहूर तालुक्यातील 62 गट ग्रामपंचायत अंतर्गत शंभर पेक्षा जास्त गावे असून ही सर्व गावे अतिदुर्ग डोंगर दर्या खोऱ्यात वसलेली आहेत अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसताना पडलेल्या पावसामुळे नुकसानीची माहिती मिळाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी भर पावसात आपल्या सहकार्या समवेत वाई बाजार सर्कलमधील अनेक गावासह हडसणी ईवळेश्वर कुपटीसह अनेक गावांना तात्काळ भेटी देऊन प्रत्यक्ष चिखल असलेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला तसेच ज्या गावात भेटी दिल्या त्या गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सावधानतेच्या इशारा देत नुकसानीची परिपूर्ण माहिती देण्याचे आदेशित केले.

माहूर तालुक्यातील खेड्यापाड्यात जाणाऱ्या अनेक रस्त्या वर असलेल्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने अनेक पूल उखडून गेले असून इवळेश्वर मार्गावरील फुल उखडून गेल्याने रस्ता बंद झाला होता त्याची पाहणी करून त्याचाही अहवाल वरिष्ठाकडे पाठविला असून पोळ्याच्या दिवशीही घरी न थांबता तहसीलदार किशोर यादव यांनी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला असून सर्व मंडळ अधिकारी तलाठ्यासह सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा देत अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असून पाऊस सुरूच असल्याने कुठेही कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास तात्काळ माहिती देण्याचे आदेशित करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button