Inspection of crop damage of 20 villages ; भर पावसात वीस गावाच्या पीक नुकसानीची पाहणी पूर्ण शेत नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर -NNL
श्रीक्षेत्र माहूर| राज ठाकूर। माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगफुटी अतिवृष्टी सारखा पाऊस पडल्याने पैनगंगा नदी पात्र दुथडी भरून वाहत पुलावरून पाणी गेल्याने खेड्यापाड्यातून नदीला मिळालेले सर्व नाले काठोकाठ भरले तसेच पाणी उतरल्यानंतर शेतात गेलेल्या पाण्याने परतीत संपूर्ण जमीन खरडून नेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार तहसीलदार किशोर यादव यांनी भर पावसात सोमवार दि,2 रोजी माहूर तालुक्यातील वानोळा सर्कल वाई बाजार सर्कल मधील वीस गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केल्याची तत्परता दाखविल्याने नागरिकासह शेतकऱ्यातून तहसीलदार किशोर यादव यांचे अभिनंदन होत आहे.
माहूर तालुक्यातील 62 गट ग्रामपंचायत अंतर्गत शंभर पेक्षा जास्त गावे असून ही सर्व गावे अतिदुर्...
