नांदेड/कुंडलवाडी| शेतीला पाणी देण्यासाठी जाताना रोडवर ठेवलेली लुना चोरीला गेली होती, याचा तपस करताना आठवडी बाजारात लुना घेऊन आलेल्या आरोपीस पोलिसांनी पाठलाग करत पकडून लुना चोरीचा गुन्हा ०८ तासात केला उघड केला आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल वरिष्ठानी अभिनंदन केले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०७.०२.२०२५ रोजी यातील फिर्यादी इरेश गंगाधर गंगोणे वय ५५ वर्ष व्यवसाय शेती रा. कुंडलवाडी ता. बिलोली हे रात्री ०९.०० वाजता आपल्या शेताच्या जवळ रोडवर टी.व्ही. एस कंपनीचा लुना क्रमांक एम.एच २६ बी.एम ५७१३ असलेला व XL 100 मॉडेल असलेला तसेच त्याचा चेसीस नंबर MD621EP16J1h28348 त्यावर लाल व पिवळे पटटे असलेला रोडवर लावून शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेला होता. शेतामध्ये पाणी देवुन दिनांक ०७.०२.२०२५ रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता वाहनाजळ आला असता त्याचा लुना त्याला दिसला नाही. त्यानंतर त्याने लुनाचा शोध शेताच्या शेजारी, मौजे का-हाळ गावामध्ये, कुंडलवाडी शहर व परिसरात घेतल्याने त्याने कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा तपास पोहेकों. शेख गफुर यांना देण्यात आला होता.

दुचाकी चोरीच्या गुन्हयाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे त्यांच्या पथकातील कर्मचारी पोहेका. शेख गफुर, पोहेकों. माघव पाटील, पोहेकों. नागेंद्र कांबळे, पोकों. रघुवीर चौहान हे आरोपीच्या शोधकामी कुंडलवाडी शहर व परिसरात रवाना झाले. गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि, गुन्हयातील चोरीस गेलेला लुना हे वाहन यातील आरोपी व त्याच्या साथीदारांनी कुंडलवाडी येथील आठवडी बाजारामध्ये आणलेले आहे. यावरून कुंडलवाडी शहरातील हेडगेवार चौकाजवळ गुन्हयातील चोरीस गेलेला लुना वर एक इसम बसुन त्याच्या साथीदारांसोबत गप्पा मारत असतांना दिसुन आला.

पोलीसांना पाहुन जागेवर लुना टाकुन साथीदाराच्या मोटारसायकलवर बसुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या सोबतचे साथीदार बाजारातील गर्दीचा फायदा घेवुन दुचाकी सोडून पळून गेले. आरोपीस पोलीस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हयामध्ये त्याचे साथीदार मित्रही सहभागी असल्याचे सांगीतले. आरोपीस त्याच्या साथीदार सहकाऱ्यांचे नाव व पत्ता विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्याच्या ताब्यात ४५,०००/- फिर्यादीचा चोरीस गेलेला एक काळया रंगाचा टी.व्ही. एस कंपनीचा लुना, २५,०००/- एक बजाज प्लॅटिना कंपनीची मोटारसायकल क्रमांक ए.पी. २८ बी.जी. ३०७२ असलेली काळया रंगाची व ज्यावर लाल पटटे असलेली लुना,आरोपी गंगाधर नागोराव सोनकांबळे यांच्या ताब्यातुन ७,०००/- रुपयाचं एक रेड मी कंपनीचा मोबाईल, एक हिरव्या रंगाची मुठ असलेला लोखंडी स्कु ड्रायव्हर, एक लाकडी मुठ असलेला लोखंडी विळा, असा एकूण किंमती ७७,०००/- रुपयाचा मुददेमाल तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले साहीत्य मिळून आले आहे. आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन, गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.
