Kundalwadi police revealed the case : कुंडलवाडी पोलीसांनी लुना चोरीचा गुन्हा ०८ तासात केला उघड
नांदेड/कुंडलवाडी| शेतीला पाणी देण्यासाठी जाताना रोडवर ठेवलेली लुना चोरीला गेली होती, याचा तपस करताना आठवडी बाजारात लुना घेऊन आलेल्या आरोपीस पोलिसांनी पाठलाग करत पकडून लुना चोरीचा गुन्हा ०८ तासात केला उघड केला आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल वरिष्ठानी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०७.०२.२०२५ रोजी यातील फिर्यादी इरेश गंगाधर गंगोणे वय ५५ वर्ष व्यवसाय शेती रा. कुंडलवाडी ता. बिलोली हे रात्री ०९.०० वाजता आपल्या शेताच्या जवळ रोडवर टी.व्ही. एस कंपनीचा लुना क्रमांक एम.एच २६ बी.एम ५७१३ असलेला व XL 100 मॉडेल असलेला तसेच त्याचा चेसीस नंबर MD621EP16J1h28348 त्यावर लाल व पिवळे पटटे असलेला रोडवर लावून शेतामध्ये पाणी देण्यासाठी ...
