HomeनांदेडSugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख...माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील...

Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख…माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील मलकागुडा येथील शेतकरी व उद्योजक नितीन पाटील कन्नलवार यांच्या शेतावरील १० एकर पैकी तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून राख झाले आहे.सदरील घटनेमुळे शेतकर्‍यासह अनेकांनी हळहळ व्यक्त करीत महावितरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

माहूर तालुक्यातील महावितरणचे विद्युत पुरवठा जाळे पूर्णतः जीर्ण अवस्थेत आले असून त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.परंतु महावितरण कंपनीला विद्युत खांबावरील जीर्ण अवस्थेत आलेले तार बदलण्याची गरज वाटत नाही,ते नवलच म्हणावं लागेल, नितीन पाटील कन्नलवार यांच्या दहा एकर शेतावर उभा असलेल्या हिरव्या गार ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून राख झाले.

IMG 20250203 WA0011 Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख...माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना

लागलेल्या आगीची वार्ता मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे,सामाजिक कार्यकर्ते अमजद खानयांचेसह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.कन्नलवार यांचे शेत मलकागुडा आणि वाई बाजार या दोन गावाच्या मध्य भागी आहे.ऊसाला लागलेल्या आगीमुळे दोन्ही कडील नागरी वस्तीला धोका पोहोचू नये, यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून माहूर नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली होती.

साखर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असून माहूर तालुक्यातील विशेषतः वाई बाजार महसूल मंडळात अधिकांश शेतकरी मागील तीन-चार वर्षांपासून उसाचे पीक घेत आहेत.ऊसाला बाण फुटला तरी यवतमाळ जिल्ह्यातील मांगुळ साखर कारखाने वाले ऊस घ्यायला तयार नाहीत. ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना शेत शिवार पिंजून ऊस लागवड करण्याचा तगादा लावतात,मात्र ऊस तोडणी ला आला असताना सुद्धा ते घेऊन जाण्यासाठी चालढकल करतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments