Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख…माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील मलकागुडा येथील शेतकरी व उद्योजक नितीन पाटील कन्नलवार यांच्या शेतावरील १० एकर पैकी तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून राख झाले आहे.सदरील घटनेमुळे शेतकर्यासह अनेकांनी हळहळ व्यक्त करीत महावितरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
माहूर तालुक्यातील महावितरणचे विद्युत पुरवठा जाळे पूर्णतः जीर्ण अवस्थेत आले असून त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.परंतु महावितरण कंपनीला विद्युत खांबावरील जीर्ण अवस्थेत आलेले तार बदलण्याची गरज वाटत नाही,ते नवलच म्हणावं लागेल, नितीन पाटील कन्नलवार यांच्या दहा एकर शेतावर उभा असलेल्या हिरव्या गार ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून राख झाले.
लागलेल्या आगीची वार्ता मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे,सामाजिक कार्यकर्ते अमजद खानयांचेसह अनेकांनी घटन...
