HomeनांदेडA case has been registered : नांदेडच्या भाजीविक्रेत्यास लुटणाऱ्या दोन अज्ञात भुरट्या...

A case has been registered : नांदेडच्या भाजीविक्रेत्यास लुटणाऱ्या दोन अज्ञात भुरट्या चोरावर गुन्हा दाखल

नांदेड| नांदेडच्या आनंद नगर परिसरात भुरट्या चोराकडून हातगाडे वाल्याची लूट (a handcart was looted by a sneaky thief) केली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याचे वृत्त प्रकाशित होताच विमानतळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आनंद नगर परिसरात राज मॉल जवळ दिनांक 18 जानेवारी रोजी पहाटे 4:30 वाजता भाजीपाला विक्रेता भाजी खरेदीसाठी जात असताना दोन युवकांनी पकडुन जबर मारहाण करत पैसे व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. अश्या भुरट्या चोऱ्या वाटमारी शहरात होत असेल तर कोणीही सुरक्षित नाही असा सूर जनतेतून निघत असल्याचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केले होते. भुरट्या चोरांवर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी जनतेतून करण्यात आली होती.

नागरिकांच्या मागणीची दाखल घेत शहरातील आनंदनगर भागात पहाटेच्या वेळी भाजी विक्रेत्याला लुबाडनाऱ्या अज्ञात दोघांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी कलम 309 (6) 3.5 बीएनएस 2023 कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. भाजी विक्रेता शिवहार रामेश्वर स्वामी रा.महाराणा प्रताप चौक नांदेड हा पहाटे साडेचार वाजता आनंद नगर येथून जात असताना स्कुटीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या जवळील दीड हजार रुपये आणि सहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाइल हिसकावून पळ काढला होता. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजवरून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री साने हे करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments