नांदेड| उस्माननगर पोलीस हददीत येळी रेती घाटावर अवैध रेती उपसा चालु असल्याची माहिती मिळल्यानंतर पोलीस आणि महसूलच्या विशेष पथकाने 10 तराफे, 02 बोट, 04 इंजिन असा एकुण 25 लक्ष रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या कार्यवाहीमुळे रेती माफियात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन पलश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी उस्माननगर पोलीस हददीत येळी रेती घाटावर अवैध रेती उपसा चालु आहे. अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी विठ्ठल परळीकर तहसिलदार लोहा, चंद्रकांत पवार सपोनि गजानन गाडेकर पोउपनि, व पो.स्टे. उस्माननगर येथील स्टाफ व महसुल कर्मचारी यांचे समवेत जावुन संयुक्त मोहिम राबवुन कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई दरम्यान अज्ञात व्यक्ती कडुन गौण खनिजाचा अवैध उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले 10 तराफे, 02 बोट, 04 इंजिन असा एकुण 25,00,000/- रू साहित्य नष्ट करण्यात आले असुन महसुल विभागाकडुन अहवाल व पंचनामा प्राप्त होताच, महसुल पथकाचे तक्रारी वरून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे. उस्माननगर पोलीसांनी चांगली कामगीरी केल्याने वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब नांदेड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, डॉ. आश्विनी जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार, सपोनि, पोस्टे उस्माननगर श्री गजानन गाडेकर, पोउपनि, पोस्टे उस्माननगर महसुल पथक विठ्ठल परळीकर तहसिलदार व इतर महसुल प्रशासनाचे कर्मचारी यांनी केली आहे.