उस्माननगर l येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची ) शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची नुकतीच बैठक बोलावून खेळीमेळीच्या वातावरणात शालेय व्यवस्थापन समिती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्षपदी राम बालाजी मोरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात येणार असल्याचे उपस्थित पालकांना शासन परिपत्रकानुसार वाचन करून सांगितले.
त्यानंतर आरक्षण पध्दतीने प्रत्येक वर्गातून पालकांची निवड करण्यात आली. उपस्थित निवडलेल्या सदस्य पालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड होताना खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्ष राम बालाजी मोरे यांच्या नावाची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
आणि सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए .एम. खान तर सदस्य म्हणून सौ. वर्षा अरविंद पोटजळे , किशोर आनंदा घोरबांड , सौ. शिल्पा तुळशीराम पलडवड , मोहम्मद गौस आदमनकर , सौ.गंगासागर मारोती वाघमारे , सौ. शबाना लायक शेख , रावण बालाजी पाटील घोरबांड , सौ.काशीबाई प्रमेश्वर पोटजळे , श्रीमती बादेवाड सुशिला उमेशराव यांची निवड करण्यात आली. तसेच एक ग्रामपंचायत सदस्य , शिक्षणतज्ञ , प्रतिष्ठित नागरिक , अंगणवाडी सेविका , आदीची या समितीमध्ये निवड करण्यात आली. सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे शाळेचे मुख्याध्यापक ए .एम. खान , सहशिक्षक एकनाथ केद्रे , श्रीमती आलेवाड मॅडम , सौ.लुंगारे मॅडम , आदी शिक्षक शिक्षिका यांनी नुतन समितीचा व शालेय व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी आलेल्या सर्व पालकांचे व गावकऱ्यांचे चांगल्याप्रकारे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करून सत्कार करण्यात आला.