Zilla Parishad School.; जिल्हा परिषद शाळेची. शालेय व्यवस्थापन समिती जाहीर अध्यक्षपदी धनंजय घोरबांड तर उपाध्यक्ष राम मोरे – NNL
उस्माननगर l येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची ) शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची नुकतीच बैठक बोलावून खेळीमेळीच्या वातावरणात शालेय व्यवस्थापन समिती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्षपदी राम बालाजी मोरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात येणार असल्याचे उपस्थित पालकांना शासन परिपत्रकानुसार वाचन करून सांगितले.
त्यानंतर आरक्षण पध्दतीने प्रत्येक वर्गातून पालकांची निवड करण्यात आली. उपस्थित निवडलेल्या सदस्य पालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड होताना खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्ष राम बालाजी मोरे यांच्या नावाची सर्वानुमते...
