HomeनांदेडShri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह...

Shri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील श्री कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सप्ताह दि. २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत भक्तिभावात साजरा होणार आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे.

सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून त्यामध्ये
ह. भ. प. सुधाकर महाराज खैरगावकर, ह. भ. प. प्रतीक्षा महाराज अनगुलवार (सवनेकर), ह. भ. प. अंजलीताई डांगे (हिमायतनगर), गजानन महाराज मरळकर, गुरुवर्य महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर, बालयोगी श्यामसुंदर महाराज बेंद्रीकर, ह. भ. प. ऋषिकेश महाराज पिपरीकर यांचा समावेश आहे.

सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने होणार असून तेही ह. भ. प. ऋषिकेश महाराज पिपरीकर यांच्या कीर्तनाने संपन्न होणार आहे.
कीर्तनासाठी संगीताची साथ गायनाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज, ह. भ. प. मारोती महाराज राहुलवाड, ह. भ. प. आनंद महाराज घोसलवाड, ह. भ. प. भगवान महाराज गुंफलवाड, मृदंगाचार्य ह. भ. प. प्रथमेश यटलेवाड, तबलावादक अशोक महाराज बोम्पीलवार, हार्मोनियम वादक रामदास बोम्पीलवार महाराज, माधव गारसेटवाड, विणेकरी अशोक महाराज आदी मान्यवर देणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कृष्ण कमिटी, गोपाळ मंडळी व कारला ग्रामस्थांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments