Friday, June 26

Tag: An uninterrupted chanting of God’s name and recitation

Shri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Shri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील श्री कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सप्ताह दि. २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत भक्तिभावात साजरा होणार आहे. या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे. सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून त्यामध्ये ह. भ. प. सुधाकर महाराज खैरगावकर, ह. भ. प. प्रतीक्षा महाराज अनगुलवार (सवनेकर), ह. भ. प. अंजलीताई डांगे (हिमायतनगर), गजानन महाराज मरळकर, गुरुवर्य महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर, बालयोगी श्यामसुंदर महाराज बेंद्रीकर, ह. भ. प. ऋषिकेश महाराज पिपरीकर यांचा समावेश आहे. सप्त...
error: Content is protected !!