श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील वाई बाजार येथे श्री दत्त जन्मउत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते.या ही वर्षी दत्तजयंती निमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत दुपारी १ वाजता येथील हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
येथील श्री दत्त मंदीराच्या भव्य दिव्य सभामंडपात भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजतापासून दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’ चा जयघोष करत आकर्षक फुलांनी सजवलेल्या, मंदीरात दत्त जन्म सोहळा फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी दिंगाबर गोस्वामी सर व उत्तमनाथ जाधव महाराज यांनी श्री दत्तप्रभुच्या मुर्तीचे पुजन,अभिषेक व ग्रंथाच्या वाचनासह विविध धार्मिक विधी पार पाडले. यावेळी हजारो महिला भाविकांची उपस्थिती होती. यानंतर दु .१ : १५ मि.श्री दत्त प्रभुच्या पाळण्याची दोर हातात धरुण दत्त जन्म पाळणागीत गावून आरती करण्यात आली व लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता.साय.६ वा नित्यनेमाणे होणारी श्री दत्त प्रभुची आरती करण्यात आली व राञी १० वाजता पासून सोळस महापुजेला सुरुवात करण्यात आली होती.