नांदेड| उप विभाग नांदेड शहर व पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड पोलीसाकडुन वागदरा बार, मालेगाव रोड नांदेड येथील निवासी फ्लॅट मध्ये अवैद्य अनैतीक व्यवसाय करणारे विरुध्द कारवाई करण्यात अली आहे. या कार्यवाहीची एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड पोलीसांना वागदरा बार, मालेगाव रोड नांदेड येथील निवासी फ्लॅट मध्ये अवैद्य अनैतीक व्यवसाय चालु असल्या बद्दल मिळालेल्या गुप्त बातमी वरुन दिनांक 28/11/2024 रोजी श्रीमती किरितीका सि.एम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभाग नांदेड शहर तसेच पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी छापा टाकला.
या कार्यवाहीत त्यांचे अधिनस्त व उप विभाग नांदेड शहर येथील कार्यरत पोअनि/नरेश वाडेवाले, पोअनि/लोणेकर, पोहेकॉ/2316 कळके, पोहेकॉ 2252 तोडसाम, पोहेकॉ/1967 जाकोरे, पोहेकॉ/784 कदम, पोकॉ/1335 लाडगे, पोकॉ/1197 झंपलवाड, मपोहेकॉ/2525 केळगंद्रे, मपोकॉ/593 भोकरे, मपोकॉ/3248 राठोड, मपोकॉ/3126 मेहरकर असे व दोन पंच आणि बनावट ग्राहक पाठवुन वेळ 16.00 वाजता वागदरा बार, मालेगाव रोड नांदेड येथील निवासी फ्लॅट मध्ये छापा मारला असता तेथे वैश्या गमन करणारे 06 महिला व 12 पुरुष मिळुन आले असुन संबधीत अवैद्यरित्या कुंटनखाना (वैश्या व्यवसाय) चालविणारे इसमा विरुध्द अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगीरी हे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड,खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती किरितीका सि.एम. सहाय्यक पोलीस अधीक्षकक्षा विभाग नांदेड शहर व पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड प्रभारी अधिकारी श्री रामदास शेंडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिंनदन केले आहे.