हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हार, घरोघरी पेढे वाटून महायुतीच्या समर्थक कार्यकर्त्याकडून आणि येथील श्री परमेश्वर ट्रस्टच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे.
मागील ३० वर्षांपासून जनसेवेत कार्यरत असलेले लोकनेते तथा नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर याना हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके जेष्ठ नागरिक व सर्वानी भरभरून मताचे दान देऊन विधानसभेवर पाठविले आहे. त्यानंतर दिनांक २९ रोजी त्यांचा हिमायतनगर ( वाढोणा ) नगरीत आगमन झाले. शहर आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत साईनाथ कोमावार जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हाताने स्वागत केले. तर भाजपचे आशिष सकवान व त्यांच्या मित्रमंडळींनी घरोघरी पेढे वाटले महायुतीच्या समर्थक कार्यकर्त्याकडून आणि तालुक्यातील ग्रामदिन भागातून आलेल्या सर्व सरपंच, गावकरी तसेच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या कमिटीच्या वतीने जंगी स्वागत करून पुढील जसेवेच्या कार्यसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले कि, सर्वसामाजाला सोबत घेऊन विकास कामे केली जातील कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच मागील १८ वर्षांपासून हादगाव हिमायतनगर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री परमेश्वराची शपथ घेऊन वचन देतो. हदगाव – हिमायतनगर येथे छोटे मोठे उद्योग आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी एमआयडीसी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. तसेच शेतकरी, निराधार, शहरातील नागरिकांच्या आरोग्यच्या दृष्टीने व दुर्गंधी आणि डासांपासून मुक्ती देण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रेनल लाइनसाठी १०० कोटीच्या प्रस्ताव पाठविला आहे तो पूर्ण केला जाईल.
यासह मतदार संघातील सर्व समाजाच्या आवश्यक त्या समस्या सोडविण्यासाठी आणि प्रशासनाला शिस्त लावून गोगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी वेळ वाया न घालता प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकून सेवा करण्याची संधी दिली त्याला कुठेही तडा जाऊ देणार नसल्याचे वचनही त्यांनी परमेश्वराच्या साक्षीने दिले. तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, ज्ञात अज्ञात व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते व तसेच शहरातील लाडक्या बहिणी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक लताबाई मुलंगे, संचालक अनिल मादसवार, संचालक विलास वानखेडे, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, हिंगोलीचे जी.प.सदस्य चितांगराव कदम, माजी जी प सदस्य लांडगे मामा, माजी जी प सदस्य सत्यवृत्त ढोले, निराधार समितीचे अध्यक्ष विजय वळसे, दासरी मालादासरी समाजाचे अध्यक्ष मुराहारी यंगलवार, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ.प्रसाद डोंगरगावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, विकास पाटील देवसरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील शेलोडेकर, शहराध्यक्ष गजानन हरडपकर, तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे, तालुकाध्यक्ष गजानन चायल, बाबुराव बोड्डेवार, भाजप विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव मिराशे, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद भाई, मुख्तार भाई, माजी नगरसेवक अन्वर खान, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, दिनेश राठोड, संतोष कदम, माजी नगरसेवक सदाशिव सातव, फेरोज कुरेशी, राजेश जाधव, साईनाथ कोमावार, उदय देशपांडे, राम नरवाडे, नाथा पाटील कार्लेकर, शिवसेना अलसंख्यांक तालुका प्रमुख शेख अफरोज, सुनील चव्हाण, ज्ञानेश्वर पुठेवार, आदींसह हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.