MLA Baburao Kadam Kohlikar ; हिमायतनगर वाढोणा शहरात नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जंगी स्वागत -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हार, घरोघरी पेढे वाटून महायुतीच्या समर्थक कार्यकर्त्याकडून आणि येथील श्री परमेश्वर ट्रस्टच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे.
मागील ३० वर्षांपासून जनसेवेत कार्यरत असलेले लोकनेते तथा नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर याना हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके जेष्ठ नागरिक व सर्वानी भरभरून मताचे दान देऊन विधानसभेवर पाठविले आहे. त्यानंतर दिनांक २९ रोजी त्यांचा हिमायतनगर ( वाढोणा ) नगरीत आगमन झाले. शहर आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत साईनाथ कोमावार जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हाताने स्वागत केले. तर भाजपचे आशिष सकवान व त्यांच्...
