Homeक्राईमउमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त...

उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

उमरखेड, अरविंद ओझलवार। मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी येथील भारत फायनांन्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरखेड येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता .

दि २७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपणीय शाकेस गोपनीय माहिती मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजी वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असुन शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन आहे. प्राप्त माहितीनुसार पथकाने शेख निसार शेख उस्मान याच ताब्यात घेऊन आनंद नगर येथील घरफोडी बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदरची चोरी त्याचे उमरखेडयेथील साथीदार आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड , फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम नगर नांदेड रोड उमरखेड , अब्दुल कहुस शेख मुज्जीत रा. एम. के. गार्डन रोड, उमरखेड यांचे सोबत मिळुन केल्याचे व तिजोरीतील पैसे आपआपसात वाटुन घेतल्याचे सांगीतल्याने नमुद सर्व आरोपीतांना ताब्यात घेतले.

आणि त्यांचेकडुन त्यांनी गुन्हयात वापरलेल्या तिन मोटार सायकल व गुन्हयातील रक्कमेतुन खरेदी केलेली बुलेट व मोबाईल असा एकुण तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयात आरोपी क्र. ५) शेख अजहर उर्फ शुट शेख अकवर रा. उमरखेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन तो सध्या उमरखेड येथील एका गुन्हयात न्यायालयीन कोठडीत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपीतांना पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही . पोलीस अधीक्षक, डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, . आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स पो नि गजानन गजभारे, पो उप नि शरद लोहकरे, पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments