उस्माननगर | येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दिवाळीच्या सुट्ट्या लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक राहुल सोनसळे व सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला.
सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील पहीली ते सातवी पर्येत प्रथम सत्र परिक्षा संपल्यावर शिक्षण विभागाने दिवाळीच्या वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या. सम्राट शाळेत विद्यार्थ्यी अध्यापन सोबतच विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थी प्रथम सत्रातील परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये मामाच्या गावाला जातात. त्यांची भेट होत नसल्याने प्रथम सत्रातील शेवटच्या दिवशी म्हणजे दि २६ ऑक्टोबर शनिवारी दुपारी शाळेतील सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी खिचडी , ,जिलेबी , समोसा , खिर , वटाणा , मिठाई या पदार्थांचा विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी शाळेतील शिक्षक , सहशिक्षिका,यांची उपस्थिती होती. या संकल्पनेचा पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.